हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank कडून आपल्या ग्राहकांना एक झटका दिला गेला आहे. वास्तविक बँकेने आता FD च्या खात्यातून मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ केली आहे. 16 मे 2022 पासून हे नवीन शुल्क लागू केले जाईल, असे बँकेने म्हंटले आहे.
यापूर्वी 181 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी कोणताही दंड आकारला जात नव्हता. मात्र Yes Bank आता ग्राहकांकडून 0.25% शुल्क आकारणार आहे. 182 दिवस किंवा त्याहून अधिकच्या कालावधीच्या FD वरील दंड 0.5 टक्क्यांवरच ठेवण्यात आला आहे. अशातच, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना मुदती आधीच काढण्याच्या दंडातून सूट देण्यात आली आहे.
असा असेल नवीन नियम (Yes Bank)
>> मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्याचा दंड सर्व प्रकारच्या ग्राहकांना लागू होईल.
>> 5 जुलै 2019 ते 9 मे 2022 या कालावधीत FD अकाउंट उघडल्या किंवा रिन्यूअल केलेल्या येस बँकेच्या कर्मचाऱ्यां कडूनही मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी दंड आकारला जाईल. मात्र, 10 मे 2021 रोजी किंवा नंतर उघडलेल्या किंवा रिन्यूअल अकाउंटसाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
>> थोडे किंवा पूर्ण पैसे काढण्यासाठी मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्याचा दंड आकारला जाईल.
>> फॉरेन करन्सी नॉन रेसिडन्स अकाउंट (FCNR) आणि RFC मधील FD वर मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी Yes Bank या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/
हे पण वाचा :
FD Interest Rates : PNB कडून FD च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
FD Rates : आता ‘ही’ सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा
Stock Market : भारतीय शेअर बाजारात सतत घसरण का होते आहे ??? त्यामागील कारणे समजून घ्या
Earn Money : ‘या’ नंबरची नोट मिळवून देईल लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या