खडी क्रेशर वर देखरेख करणाऱ्याची निर्घृण हत्या, येवला येथील प्रकार

0
53
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

येवला तालुक्यातील खामगाव येथे सुदाम कारभारी कदम यांच्या खडी क्रेशरवरील मालमत्ता त्यात प्रामुख्याने खडी क्रेशर च्या महागड्या मशनरी, तयार असलेली विक्रीसाठी खडी ,व वाहतुकीसाठी असलेली आवश्यक वाहने त्यात- त्यांचे जावई अविनाश गाढे यांचे महागडे ढंपर विचारात घेऊन कदम यांनी, रात्री देख- -रेखीसाठी खामगाव पाटी येथील तुळशीराम मोतीराम सुराशे यांची नियुक्त केली होती व ते नेहमीप्रमाणे देखरेख करत होते.

सकाळी पहाटे चहा प्यायला घरी येत असलेले तुळशीराम सुराशे, आज उशीर झाला तरी आले नाही म्हणुन व मोबाईल फोन लागत नसल्याने घरच्या कुटुंबतील व्यक्ती पहाटे लवकर घटनास्थळी दाखल झाले ,तेव्हा त्यांना दोन पैकीं एक ढंपर चोरिला गेल्याचे आढळून आले ,तर दुसऱ्या ढंपर च्या कॅबिन मध्ये तुळशीराम मोतीराम सुराशे यांचा मृतदेह आढळुन आला . कुटुंबातील व्यक्तींनी सदर घटनेची माहिती येवला पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना दिली. त्यांना माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले ,रात्रीच्या वेळी आंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तुळशीराम मोतीराम सुराशे वय ६०,रा. खामगाव पाटी, यांची हात पाय बांधुन ढंपर च्या कॅबिनमध्ये हत्या केल्याची माहिती मिळाली आहे,त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला,

त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती व गावातील ग्रामस्थांनी मोठा गदारोळ केला व झालेल्या प्रकाराविषयी त्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी मागणी केली,तसेच पोलीस निरीक्षक पाटील साहेब तसेच उपपोलीस निरीक्षक विलास ताटी कोंडीलवार, पोलीस हवालदार हेंबाडे, यांच्यासह अन्य,डॉगस्कॉड पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here