Cibil Score : सिबिल स्कोअर फ्री मध्ये कसा चेक करायचा? जाणून घ्या कामाची गोष्ट

Cibil Score
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cibil Score : आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेकदा आपल्याला पैशांची कमतरता जाणवते. विशेषतः आणीबाणीच्या प्रसंगी. अशा वेळी पैसे मिळण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले जाते. मात्र बँकांकडून कर्ज देण्याआधी आपला CIBIL स्कोअर तपासला जातो. याद्वारे आपल्याला कर्ज मिळेल की नाही हे ठरवण्यात बँकेला मदत होते. हे लक्षात घ्या कि, Cibil Score रला क्रेडिट स्कोअर असेही म्हंटले जाते.

What is CIBIL Score or Credit Score | Best Tips 2021

CIBIL ही देशातील चार क्रेडिट रेटिंग एजन्सीपैकी एक आहे. Cibil Score हे एक प्रकारचे रेटिंग आहे, जे 3 अंकांमध्ये दर्शविले जाते. याद्वारे बँकेला संबंधित ग्राहकाच्या क्रेडिट हिस्ट्रीबाबतची माहिती मिळते. CIBIL स्कोअर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. तसेच ज्या ग्राहकाचा CIBIL स्कोअर 900 च्या जवळ असतो, त्या ग्राहकाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असते.

CIBIL च्या वेबसाइट शिवाय, बँकिंग सर्व्हिसेस एग्रीगेटर्सच्या वेबसाइटवरही क्रेडिट स्कोअर तपासता येतो. CIBIL च्या वेबसाइटवर क्रेडिट स्कोअर तपासण्याची सुविधा मोफत उपलब्ध आहे. यासोबतच फ्री सब्‍सक्रिप्‍शन प्लॅन घेऊनही तो तपासता येतो. याद्वारे आपला सध्याचा CIBIL रिपोर्ट वर्षातून एकदाच तपासता येतो. तर CIBIL च्या वेबसाइटद्वारे क्रेडिट स्कोअर फ्रीमध्ये तपासण्यासाठी खाली काही स्टेप्स दिल्या आहेत त्या फॉलो करा…

CIBIL score check: How to get FREE credit score report online using a PAN  card, Aadhaar, Passport, and more | 91mobiles.com

स्टेप 1 : लॉग इन करा

Cibil Score तपासण्यासाठी सर्वात आधी CIBIL च्या वेबसाइट https://www.cibil.com/ वर जावे लागेल. यानंतर या पेजच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात असलेल्या ‘Get Your CIBIL Score’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण सब्‍सक्रिप्‍शन ऑप्‍शंस पेजवर जाल. आता फ्री ऑप्‍शनसाठी खाली स्क्रोल करावे लागेल.

स्टेप 2 : तयार करा खाते

आपल्याला इथे ईमेल आयडी, नाव (या खात्यासाठी तो युझरनेम असेल), पासवर्ड, आयडी प्रूफ (जसे की पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट नंबर, आधार) जन्मतारीख, पिन कोड आणि मोबाइल क्रमांक इ माहिती द्यावी लागेल. यानंतर, ‘Accept and Continue’ वर क्लिक करावे लागेल.

How to Check CIBIL Score Online and Its Benefits

स्टेप 3 : आपली ओळख व्हेरिफाय करा

यांनतर आपली ओळख व्हेरिफाय करावी लागेल. यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. तो एंटर करून ‘Continue’ वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 4 : डॅशबोर्डवर जावे लागेल

यानंतर आपल्या एनरोलमेंटची पुष्टी करत नवीन विंडोमध्ये नेले जाईल. याबाबत एक ई-मेलही पाठवला जाईल. यानंतर आपला Cibil Score तपासण्यासाठी ‘Go to Dashboard’ वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 5 : CIBIL स्कोअर तपासा

http://myscore.cibil.com वर नेले जाईल. इथे CIBIL स्कोअर आणि CIBIL रिपोर्ट फ्रीमध्ये तपासता येईल.

एकदा खाते तयार झाल्यानंतर https://myscore.cibil.com/ या वेबसाईटवर ‘मेंबर लॉगिन’ निवडून CIBIL स्कोअर पाहता येईल. इथे लॉगिन करण्यासाठी ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. तसेच त्याच वर्षी पुन्हा Cibil Score चेक करण्यासाठी CIBIL च्या पेड प्लॅनचे सब्‍सक्रिप्‍शन घ्यावे लागेल.

हे पण वाचा :
Maruti Suzuki : कंपनीने घेतला मोठा निर्णय; आजपासून गाड्यांचे किंमतीत झाले बदल, चेक करा..
Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धारक खूश; नवीन नियम जाणुन घ्या
Mahila Samman Savings Certificate योजना झाली सुरु, याद्वारे कसा फायदा मिळेल ते पहा
Multibagger Stock : गोदरेज ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 22 वर्षात दिला 23404 टक्क्यांहून जास्त रिटर्न
Trade in Rupees : खुशखबर !!! आता पहिल्यांदाच भारतीय रुपयांत होणार परदेशी व्यापार, भारत-मलेशियामध्ये झाला मोठा करार