व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आता नंबर सेव्ह न करताही WhatsApp वर पाठवता येणार मेसेज !

नवी दिल्ली । इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत ज्यामुळे युझर्सचा अनुभव आणखी चांगला होऊ शकेल. त्याच वेळी भविष्यात असेही अनेक फीचर्स लॉन्च केले जाणार आहेत जे तुम्हाला अनेक जबरदस्त सुविधा देऊ शकतील. सध्या कंपनी अशाच एका फीचरची टेस्टिंग करत आहे ज्याअंतर्गत व्हॉट्सअ‍ॅपवरील कोणत्याही नंबरवर मेसेज सेव्ह न करता पाठवले जाऊ शकतील. याबद्दल बोलायचे झाल्यास सध्या असे करणे खूप अवघड जाते. मात्र या नवीन अपडेटमुळे हे काम खूप सोपे होणार आहे. यानंतर तुम्ही कोणत्याही नंबरवर मेसेज सेव्ह न करता सहजपणे पाठवू शकाल.

व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी ज्या नवीन अपडेटवर काम करत आहे त्यामध्ये यूजर्स नंबर सेव्ह न करता कोणालाही मेसेज करू शकतील. हे बीटा व्हर्जन 2.22.8.11 आहे. या नवीन अपडेटनंतर, जेव्हा कोणी तुमच्या चॅटवर नंबर शेअर करेल, तेव्हा तुम्ही त्यावर टॅप करून थेट त्या व्यक्तीला मेसेज करू शकाल. यासाठी तुम्हाला फोनमध्ये नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. आता तुम्ही नंबर सेव्ह केल्याशिवाय तुम्ही कोणालाही मेसेज करू शकत नाही. हे करण्याचा वेगळा मार्ग आहे.

मात्र, हे नवीन अपडेट युझर्ससाठी कधी रिलीज होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. बीटा टेस्टिंग नंतर ते स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय मेसेज फॉरवर्डिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप आणखी एका नवीन अपडेटवरही काम करत आहे. या अपडेटनंतर, युझर्स केवळ एक नंबर किंवा एकाच ग्रुपसह मेसेज शेअर करण्यास सक्षम असतील.

या सर्व फीचर्सची iOS आणि Android वर एकाच वेळी टेस्टिंग केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे फॉरवर्ड फीचर स्पॅम मेसेज देखील ब्लॉक करेल.