नवी दिल्ली । जर तुम्ही देखील तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पेपर नॅपकिन्सच्या व्यवसायात नशीब आजमावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. पेपर नॅपकिन्स बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट करून तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आणि याद्वारे तुम्ही किती कमाई करू शकाल हे आज आपण जाणून घेउयात.
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा जास्त वापर होऊ लागला आहे. सहसा हात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो. आजकाल रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा, ऑफिस, हॉस्पिटल अशा जवळपास सर्वच ठिकाणी ते सऱ्हास वापरले जाते.
किती गुंतवणूक करावी लागेल ?
जर तुम्हाला पेपर नॅपकिन म्हणजेच टिश्यू पेपरचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारायचे असेल तर तुम्हाला सुमारे 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. इतके पैसे मिळाल्यानंतर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. तुमच्याकडे 3.50 लाख रुपये असल्यामुळे, तुम्हाला बँकेकडून सुमारे 3.10 लाख रुपये टर्म लोन आणि 5.30 लाखांपर्यंतचे वर्किंग कॅपिटल लोन मिळेल. एका वर्षात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिन्स तयार होऊ शकतात. सुमारे 65 रुपये किलो दराने त्याची विक्री होऊ शकते. म्हणजेच तुम्ही एका वर्षात सुमारे 97.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता. यातील सर्व खर्च काढून टाकल्यास वर्षाला सुमारे 10-12 लाख रुपयांचे सेव्हिंग होऊ शकते.
मुद्रा योजनेअंतर्गत अशा प्रकारे अर्ज करा
यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, ऍड्रेस, बिझनेस ऍड्रेस,एज्युकेशन, सध्याचे इनकम आणि किती लोन लागेल याचे तपशील द्यावे लागतील.. यामध्ये कोणतीही प्रोसेसिंग फीस किंवा गॅरेंटी फीस भरावी लागणार नाही. यामध्ये कर्जाची रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते.