नवी दिल्ली | भारतीय रेल्वे ही अधिक-अधिक विना आरक्षित रेल्वे सेवांचे संचलन सुरु करण्यासाठी तयार आहे. रेल्वे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये अजून वाढ व्हावी या उद्देशाने भारतीय रेल्वेने 5 एप्रिल 2021 पासून 71 विना आरक्षित रेल्वे ट्रेन सेवा सुरू करणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यानुसार, अनारक्षित रेल्वे या प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायक यात्रा अनुभव देऊ शकतील. उत्तर रेल्वे झोन, रेल्वे यात्रेच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वे नेटवर्क वेगवेगळे जोड हे अनारक्षित मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांसाठी चालवले जात आहेत.
भारतीय रेल्वेने पाच एप्रिलपासून ज्या 71 लोकल रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये, 17 रेल्वे गाड्या दिल्ली एनसीआरशी संबंधित आहेत. या सर्व रेल्वे गाड्या या एक्सप्रेस बनवून चालवल्या जाण्याचा निर्णय घेतला आहे. 5 एप्रिल पासून पानिपत, कुरुक्षेत्र, गाजियाबाद, रेवाडी, पलवल, सहारनपुर, अंबाला आणि श्यामली इत्यादी रूट वरती या ट्रेन चालवल्या जातील. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा मोठा प्रश्न यामुळे सुटू शकणार आहे.
यादरम्यान दिल्लीपासून झांसी गतिमान एक्सप्रेसने एक एप्रिल पासून आपली सेवा सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्यानुसार दिल्लीपासूनची गतिमान एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांकडे सुरक्षित, आरामदायक आणि सुविधाजनक यात्रा करण्याचे साधन असणार आहे. प्रवासी हे आयआरटीसीटीच्या वेबसाईट अथवा मोबाईल ॲप्लिकेशनवरून तिकीट बुक करू शकतात. व सोबतच मोबाईल ॲप्लिकेशन वरून गाड्यांची यादी ही मिळवू शकतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group