आता डेबिट कार्डशिवायही तुम्ही SBI ATM मधून काढू शकाल पैसे, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल आणि पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड नेण्यात अडचण येत असेल किंवा ATM कार्ड घरी विसरला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक, SBI आपल्या ग्राहकांना ATM/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देते. यासाठी बँक तुम्हाला YONO कॅशची सुविधा देते. त्याच्या मदतीने, तुम्ही ATM तसेच POS टर्मिनल्स आणि कस्टमर सर्व्हिस पॉइंट्स (CSP) मधून पैसे काढू शकाल.

यासाठी तुमच्या फोनमध्ये SBI चे योनो अ‍ॅप असले पाहिजे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही देशातील SBI ATM मधून पैसे काढू शकता. या सुविधेद्वारे, तुम्ही SBI ATM मधून किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकता.

SBI ATM वर ‘ही’ पद्धत फॉलो करा
>>सर्वप्रथम YONO अ‍ॅपला लॉगिन करा.
>> यानंतर होम पेजवर YONO Cash वर क्लिक करा.
>> आता YONO Cash मध्ये ATM सेक्शनमध्ये क्लिक करा.
>> त्यानंतर रक्कम टाका.
>> आता 6 अंकी पिन बनवावा लागेल. यानंतर YONO कॅश ट्रान्सझॅक्शन नंबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल. ते 6 तासांसाठी व्हॅलिड राहते.
>> ATM वर YONO कॅश पर्यायावर टॅप करा. यानंतर, तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवलेला YONO कॅश ट्रान्सझॅक्शन नंबर आणि तुम्ही तयार केलेला 6 अंकी पिन टाकावा लागेल.
>> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही रोख रक्कम जमा करू शकता.

Leave a Comment