50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा चेक देत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकाल, RBI चा नवीन नियम काय आहे ते जाणून घ्या

0
29
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा नसेल तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्हॅल्यूचे चेक देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतेक बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील.

विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम (CTS) साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती. या नियमानुसार, बँका ही सुविधा सर्व खातेधारकांना त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी लागू करू शकतात.

चेक नाकारला जाईल
RBI च्या या नियमानुसार, चेक देण्यापूर्वी, तुम्हाला बँकेला याबद्दल माहिती द्यावी लागेल अन्यथा चेक स्वीकारला जाणार नाही. तुमचा चेक नाकारला जाईल. तथापि, या नियमामुळे जेष्ठ नागरिक जे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या सेवा वापरत नाहीत त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.

या बँकांनी नियमांची अंमलबजावणी केली
एक्सिस बँकेसह काही बँकांनी 50 हजारांपेक्षा जास्त चेकसाठी PPS अनिवार्य केले आहेत, ज्या अंतर्गत ग्राहकांना नेट / मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेला भेट देऊन बँकेला चेक तपशील द्यावा लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँकेने 50,000 रुपयांच्या वरील चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली आहे. सध्या या बँकांनी ते ग्राहकांसाठी पर्यायी ठेवले आहे. हा नियम लागू करण्याचा हेतू ग्राहकांची सुरक्षा आहे. ही सिस्टीम चेकमध्ये फसवणूक रोखू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here