You Tube : यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना जाहिरातींचा त्रास होत असेल तर तुमची समस्या आणखी वाढणार आहे. YouTube ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर Adblocker बंद केले आहे, याचा अर्थ आता तुम्ही Adblocker वापरून YouTube वर जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहू शकत नाही. आता तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत, एकतर YouTube चे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्या किंवा व्हिडिओसह जाहिरात पहा.
YouTube मोफत नसतानाही काही लोक जाहिरात ब्लॉकर वापरून YouTube वर विनामूल्य व्हिडिओ पाहत होते. YouTube वर, तुम्हाला एकतर प्रीमियम सदस्यता घ्यावी लागेल किंवा तुम्हाला जाहिराती पाहाव्या लागतील. तिसरा पर्याय नाही.
YouTube ने पाठवला अलर्ट
युट्यूबने अॅड ब्लॉकर्स वापरणाऱ्या अनेक युजर्सना यासाठी अलर्टही पाठवला आहे. अलर्टमध्ये यूट्यूबने म्हटले आहे की, तीन व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा व्हिडिओ प्लेयर ब्लॉक केला जाईल. याचाच अर्थ तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात. YouTube ने आधीच सांगितले केली आहे की जाहिरात ब्लॉकर वापरणाऱ्या वापरकर्त्यांच्या खात्यांवर व्हिडिओ डिसेबल केले जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अॅड ब्लॉकर वापरणे हे यूट्यूबच्या पॉलिसीचे उल्लंघन आहे.
जाहिरातींच्या बाबतीत केले बदल
YouTube ने यावर्षी आपल्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातींच्या बाबतीत बरेच बदल केले आहेत, ज्यामध्ये 30-सेकंद न सोडता येणाऱ्या जाहिरातींचाही समावेश आहे. यूट्यूब टीव्हीवरही एवढ्या मोठ्या जाहिरातीची तयारी सुरू आहे.
YouTube प्रीमियम प्लॅनची भारतातील किंमत
एका महिन्याच्या प्लॅनची किंमत 139 रुपये आहे. तुम्ही ऑटो रिन्यू निवडल्यास या प्लॅनची किंमत 129 रुपये होईल.
तीन महिन्यांच्या प्लॅनची किंमत 399 रुपये आहे.
12 महिन्यांच्या योजनेसाठी तुम्हाला 1,290 रुपये खर्च करावे लागतील.