नवी दिल्ली । वीटभट्ट्यांवर बांधकाम कामात गुंतलेल्या कामगारांना किंवा असंघटित क्षेत्रातील इतर मजुरांना वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ सुरू केली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना दररोज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांचे शरीर कठोर परिश्रम करण्यास तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा परिस्थितीत ही योजना त्यांच्यासाठी वरदान ठरू शकते. मासिक पेन्शनच्या स्वरूपात वृद्धावस्थेत सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली होती.
श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते. या योजनेत अशा कामगारांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकाम करणारे, वीटभट्टी कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगार पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर किमान 3,000 रुपये मासिक पेन्शन दिली जाईल.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील सुमारे 46 लाख कामगारांनी रजिस्ट्रेशन केली आहे. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत, असंघटित क्षेत्रातील एकूण 45,77,295 कामगारांनी योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केली आहे.
अर्ज करावा लागेल
ज्या कामगारांचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील आहे आणि ज्यांचे उत्पन्न दरमहा 15,000 रुपयांपेक्षा जास्त नाही ते प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कामगाराकडे मोबाईल फोन, आधार नंबर आणि बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. श्रमयोगी मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते.
ऑनलाइन अर्ज
पीएम श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत ऑनलाइन अर्जही करता येतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://www.maandhan.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला Click here to apply now वर क्लिक करावे लागेल. येथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला सेल्फ एनरोलमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला Proceed वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड भरून जनरेट OTP वर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल. तुम्हाला तो अर्ज भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.
प्रीमियम किती भरावा लागेल ?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत कामगाराला त्याच्या वयानुसार गुंतवणूक करावी लागेल. जर कामगार 18 वर्षांचा असेल तर त्याला दर महिन्याला 55 रुपये गुंतवावे लागतील. 19 वर्षे वयोगटातील लोकांना दरमहा 100 रुपये आणि 40 वर्षे वयाच्या लोकांना दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. पेन्शन सर्व्हिस सुरू होण्यापूर्वी कामगाराचा मृत्यू झाल्यास, त्याच्या/तिच्या जोडीदाराला पेन्शन रकमेच्या 50 टक्के रक्कम मिळेल.