नवी दिल्ली । जर तुम्हीही पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आता पेन्शन देण्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर अनिवार्य केला आहे.
EPFO ने PPO नंबर नसलेल्या पेन्शनवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत तुमचा PPO नंबर हरवला असेल किंवा तुम्ही विसरला असाल तर तो पुन्हा मिळवण्याचा मार्ग खूप सोपा आहे. PPO नंबर हा EPFO द्वारे कर्मचाऱ्याला त्याच्या रिटायरमेंटनंतर जारी केलेला एक युनिक नंबर आहे.
तुम्हाला येथून हरवलेला PPO नंबर मिळेल
रिटायरमेंटनंतर EPFO कडून कर्मचाऱ्याला 12 अंकी PPO नंबर दिला जातो. काही कारणास्तव तुमचा PPO नंबर हरवला असेल किंवा तुम्ही विसरला असाल, तर तुम्ही तुमच्या बँक खाते क्रमांक किंवा PF नंबरच्या मदतीने तो पुन्हा मिळवू शकता. हे काम तुम्ही घरबसल्या ऑनलाईन करू शकता.
‘या’ प्रक्रियेतून PPO नंबर मिळेल
सर्व प्रथम EPFO च्या वेबसाइटला भेट द्या.
पेन्शनर्स पोर्टल उघडून पुढील स्टेप वर जा आणि डॅशबोर्डवरील Know Your PPO नंबर वर क्लिक करा.
तुमचा रजिस्टर्ड बँक खाते क्रमांक किंवा PF क्रमांक एंटर करा.
तुम्ही सबमिट करताच, तुमचा PPO नंबर स्क्रीनवर दिसेल.
पेन्शन खाते इतर शाखेत ट्रांसफर केले जाऊ शकते
पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसर्या शाखेत ट्रांसफर करण्यासाठी तुम्हाला PPO नंबर देखील आवश्यक आहे. याशिवाय लाईफ सर्टिफिकेट सादर करताना PPO नंबर द्यावा लागतो. एवढेच नाही तर पेन्शनसंबंधी तक्रारी नोंदवण्यासाठी किंवा पेन्शनचे स्टेट्स ऑनलाइन जाणून घेण्यासाठीही हा नंबर खूप उपयुक्त आहे.