हरियाणा : वृत्तसंस्था – हरयाणाच्या पलवल जिल्ह्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रात (de addiction center) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीसाठी (de addiction center) भरती झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यानंतर तरुणाच्या आईने आरोपी व्यसनमुक्ती केंद्राच्या (de addiction center) संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय असे मृताचे नाव आहे, ज्याला दारूचे व्यसन होते आणि त्यामुळे त्याच्या आईने त्याला केंद्रात दाखल केले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
हाती आलेल्या माहितीनुसार, पलवलच्या कृष्णा कॉलनीत राहणाऱ्या अनिता देवी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत असे लिहिले आहे की, त्यांचा मुलगा विजय याला दारूचे व्यसन होते. ज्यासाठी त्यांनी विजयला असावाट गावातील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक सुंदर रहिवासी आशाता मोरड यांच्याकडे दाखल केले होते व त्यांची निश्चित फीही दिली होती. चार महिने विजय हा व्यसनमुक्ती केंद्रात (de addiction center) होता आणि मुदत संपल्यानंतर त्याला घरी परत पाठवण्यात आले. मात्र, विजयला पुन्हा दारूचे व्यसन जडले. यानंतर महिलेने विजयला पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले. यादरम्यान विजयच्या आईची प्रकृती खालावली आणि त्यामुळे ती तिच्या मुलाला भेटायला जाऊ शकली नाही.
विजय गेल्या दोन महिन्यांपासून व्यसनमुक्ती केंद्रात (de addiction center) होता. केंद्रचालकाने महिलेला फोन केला होता की, तुमच्याकडे मुदतीचे काही रुपये देणे बाकी आहे. यानंतर ती तेथे गेली आणि आपल्या मुलाला परत घेऊन आली. केंद्रातून बाहेर पडताच विजयने त्याच्या आईला सांगितले की, गेल्या पाच-सात दिवसांपासून येथे त्याला त्रास दिला गेला आहे आणि त्याची तब्येत खराब आहे. तसेच त्याच्या पोटात दुखत आहे. यानंतर या महिलेने विजयच्या तक्रारीवरून व्यसनमुक्ती केंद्राच्या (de addiction center) संचालकाला जाब विचारला तेव्हा ते म्हणाले कि, त्यांचा मुलगा नाटक करत असून तो पूर्णपणे बरा झाला आहे. यानंतर विजयच्या आईला संशय आल्याने तिने विजयला रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विजयच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार