तरुणाने अवघ्या 17 सेकंदात सोडवले रूबिक क्यूबचे कोडे; सचिनही झाला थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रुबिक क्युब हा खेळ आपल्याला सर्वाना माहीत असेल. रुबिक क्युबसह खेळाल्याने आपल्या बुद्धिमत्तेचा चांगलाच कस लागतो. काही जण हे कोडे सोडवण्यात यशस्वी ठरतात. तर काही लोकांना हे केवळ अशक्य वाटत. पण एका पठ्ठ्याने या क्युबकडे न पाहता कोडे सोडवले आहे. या तरुणाचं नाव मोहम्मद ऐमान कोली असं आहे. यामुळे या तरुणाचा खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  फॅन झाला आहे. सचिनने या तरुणासोबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सचिनने हा व्हिडीओ स्वत मोबाईलच्या फ्रंट कॅमेराने शूट केला आहे. एकूण 1 मिनिट 12 सेंकदाचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये या पठ्ठ्याने अवघ्या 17 सेकंदामध्ये हे कोडं सोडवून दाखवलं. यामुळे सचिन आणखी प्रभावित झाला.

https://www.instagram.com/tv/CL1mF73AFwc/?igshid=1t3q1hp4oji4r

या तरुणाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. यावरुन या तरुणाची हुशारी आपल्याला लक्षात येईल. यामुळे या तरुणाचा आपल्या अभिमान वाटेल. सचिनने शेअर केलेला व्हिडीओ अवघ्या 1 दिवसात 10 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like