ठाणे प्रतिनिधी। ज्या घराला वेध लागले होते सनईच्या सुरांचे त्या घरावर काळाने घाला घातला. भावी सुखी संसाराची स्वप्न पाहणारी घरातून बाहेर पडलेली भावी नववधू पुन्हा घरी परतलीच नाही. लग्नाची खरेदी करण्यासाठी डॉक्टर असलेली नेहा आलमगीर शेख आपल्या मामासोबत बाजारात गेली होती. परत येताना रस्त्यातील खड्ड्यात गाडी अडकून झालेल्या अपघातात नेहाचा जीव गेला.
ठाण्यात राहणाऱ्या शेख कुटुंबाने नेहाला डॉक्टर केले. उच्चशिक्षण झाल्यानंतर कुटुंबाला आता तिच्या लग्नाचे वेध घरच्यांना लागले होते. नेहाचं पुढील महिन्याच्या ७ तारखेला लग्न असल्याने ती लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या मामासोबत स्कुटीने गेली होती. दूगाड फाटा येथुन आपल्या ऍक्टिवा स्कुटीवरून घरी परतत असताना स्कुटी अचानक खड्डय्यात आदळली आणि स्कुटीवर मागे बसलेली नेहा खाली पडली. तितक्यात मागून येणाऱ्या भरधाव येणाऱ्या ट्रकने नेहाला चिरडले. या दुर्दैवी अपघातात नेहाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत. दरम्यान, अपघातानंतर येथील स्थानिक जनता रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांबाबत संताप व्यक्त करत आहे.
इतर काही बातम्या-
देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार
वाचा सविस्तर – https://t.co/kUBHK8TXg8@myogiadityanath @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis #VidhanBhavan #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019
मराठ्यांचं पाठबळ राष्ट्रवादीला तारणार का ? सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठींबा
वाचा सविस्तर –https://t.co/rXBO9hUSqo@NCPspeaks @AjitPawarSpeaks @NCPspeaks #maratha#marathakrantimorcha
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019
‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती
वाचा सविस्तर – https://t.co/dl1XacCnoO@RajThackeray @mnsadhikrut #election#MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2019