अकोला प्रतिनिधी। आपल्या स्वतःच्या किडनीचा सौदा केल्यांनतर संबंधित डॉक्टर कडून फसवणूक झाल्याच्या दडपणात येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किडनी प्रत्यारोपणापूर्वीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डेव्हीड नामक डॉक्टरने या युवकाला २ लाख रुपयांनी फसवले होते. त्याच तणावात युवकाने आत्महत्या केल्याची माहिती सुरुवातीला कळाली आहे.
अतुल अजाबराव मोहोड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो अकोल्यातील आळंदा येथील रहिवासी आहे. अतुल पुण्यात एका टायर कंपनीत कामाला होता.काही दिवसांपूर्वी अतुल आपल्या आळंदा गावी आला होता. गेल्या मंगळवारी पुण्याला तो परत जाणार होता. मात्र सोमवारीच तो काही न सांगता घरातून निघून गेला होता. घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी शेतातील आंब्याच्या झाडाजवळ तो मृतावस्थेत आढळून आला.
आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने शेतातील पाइपवर त्याने लिहिलेली चिठ्ठी ही शेतातील मीटर पेटीत ठेवल्याचे त्यानं नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी मीटर पेटीतून चिठ्ठी जप्त केली. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत डेव्हीड नामक डॉक्टरचा उल्लेख केला आहे. हा डॉक्टर गोरगरीब लोकांच्या किडनी काढून त्या विदेशात विकतो. त्याच्या या कामात मला पण गोवण्यात आले आहे. त्यामुळे कारणामुळे मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून. या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे. कारण तो आपल्या देशातील किडनी विदेशात विकत आहे, अस या मयत अतुलने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. अतुलने अप्लाय मृत्यूपूर्व लिहलेल्या चिठ्ठीतील हा डॉ. डेव्हिड नेमका कोण आहे? तसेच यामागे किडनी तस्करीचे मोठे रॅकेट तर सक्रिय आहे का? या अनेक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. अप्लाय मुलाच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी युवकाच्या आई वडिलांनी केली आहे.