पुणे : हॅलो महाराष्ट्र – सुमारे दोन वर्षांनंतर काल राज्यात दहीहंडीचा (dahi handi) उत्साह बघायला मिळाला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात तर प्रचंड जल्लोष होता. दहीहंडीच्या (dahi handi) उत्साहाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.पुण्याच्या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ संघाने बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी (dahi handi) सहा थर लावून फोडली. विशेष म्हणजे हंडी फोडली तेव्हा सर्वात वरच्या म्हणजे सहाव्या थरावरचा गोविंदा हा हंडीलाच लटकला आणि इतर थरावरचे गोविंदा हे खाली पडले. यावेळी सहाव्या थरावरील गोविंदाने हंडी (dahi handi) फोडली आणि हंडी बांधलेल्या दोरीला घट्ट पकडलं. हि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.
दहीहंडी फोडताना संघ खाली कोसळला आणि सहाव्या थरावर लटकला गोविंदा, Video आला समोर pic.twitter.com/mIVDSpIlIx
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 20, 2022
ढोल-ताशांचा पारंपरिक गजर आणि गोविंदा आला रे आला… च्या जयघोषात कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी (dahi handi) संघाच्या गोविंदांनी बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी 6 थर लावून फोडली. शुक्रवारी रात्री 9 वाजून 18 मिनीटांनी अवघ्या तिसर्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. मच गया शोर… काठी न घोंगडे… सारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी अतिशय चित्त थरारक अशा क्षणाची प्रेक्षकांना अनुभूती आली.
काय घडले नेमके ?
हंडी (dahi handi) फोडण्यासाठी सहाव्या थरावर चढलेला गोविंदा हा हंडीलाच लटकला आणि त्याचे इतर सहकारी हे खाली पडले. पण यावेळी गोविंदा घाबरला नाही. त्याने हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी मोठा जल्लोष केला. पण हंडी फोडल्यानंतर वरती लटकलेला गोविंदा हा तशात अवस्थेत राहिला. काही वेळाने जमिनीवर असलेल्या गोविंदांनी त्याला इशारा केला आणि त्याने खाली उडी मारली. यावेळी इतर गोविंदांनी त्याला अलगद झेललं. त्यानंतर गोविंदांनी एकच जल्लोष केला.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!||
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?