खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.; अमित ठाकरेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन ठाकरे सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत फेसबुक द्वारे पोस्ट करून राज्य सरकार व महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. “खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.” असे ठाकरे यांनी म्हंटले आहे.

अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की, “रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.

https://www.facebook.com/amitthackerayofficial/posts/1540134559674224

मुंबईतील खाड्यांबाबत व त्यांच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावली होती. त्या बैठकीबाबत व रस्त्यांवरील खाड्यांबाबत आज अमित ठाकरे यांनी आपले मत मांडले. सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.