हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पौष्टीक पदार्थ सोडून फास्ट फूड खाण्याचे प्रमाण आजकालच्या तरुणाई मध्ये चांगलं वाढलं आहे. वडा पाव, पॅटिस इथपासून ते पिझ्झा, बर्गर, सँडविच खायला सध्याची मुळे वेडी होतात … परंत्तू मुंबईत (Mumbai) रस्त्यावरील बर्गर खाल्ल्याने १० ते १२ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. प्रथमेश भोकसे असे सदर मृत तरुणाचे नाव असून या संपूर्ण घटनेनं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ट्रोम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या काही वर्षांत मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील फेरीवाल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अनेक फेरीवाले रस्त्याच्या कडेलाचा खाद्यपदार्थ शिजवून विकत आहेत. परिसरातील नागरिकही या अन्नावर ताव मारत असतात. मात्र सोमवारी संध्याकाळी याचा भागात १० ते १२ जणांनी बर्गर (Berger) खाल्ला आणि अर्धा तासानंतर या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढत गेल्याने काहीजण खासगी दवाखान्यात तर काहीजण सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले. यापैकी अनेकांना उपचारानंतर रात्री उशिरा घरी पाठविण्यात आले. मात्र यापैकी प्रथमेश भोकसे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
प्रथमेशला आगोदर याच परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान प्रथमेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रोम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र बर्गर खाल्ल्याने विषबाधा झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच रस्त्यावरील अन्नपदार्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.