धक्कादायक ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करून मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामध्ये एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून तो वायरल देखील करण्यात आला आहे. हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा या ठिकाणचा आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील एका गावातील एका तरुणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर हे दोघे गाव सोडून दुसरीकडे राहण्यास गेले. लग्नाला बरेच दिवस झाल्यावर ही मुलगी आपल्या घरी नातेवाईकांना भेटण्यासाठी आली असता मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या पतीला पकडून वाद घालण्यास सुरूवात केली.

यानंतर संतप्त नागरिकांनी मुलीच्या पतीला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर त्याचे कपडे फाडून त्याला विवस्त्रदेखील केले. हे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या तरुणाला आणखी मारहाण केली. यानंतर या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला. आणि तो वायरलदेखील करण्यात आला. या प्रकरणी पीडित मुलाने ३ जुलै रोजी खुलताबाद पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.