Video : पूराच्या पाण्यात दुचाकीसह तरुण गेला वाहून; जेसीबीच्या सहाय्याने गावकर्‍यांनी धाडस करुन वाचवले प्राण

0
69
bike flood water
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | जिल्ह्यात सर्वत्र पाऊसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती तयार झाली आहे. इंदापूर येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एकास जेसीबीच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इंदापूरात दुचाकीवरुन निघालेल्या एकाला पाण्याच्या प्रवाहाने ओढले. गावकर्‍यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने तेथे जेसीबी बोलावला. अखेर जेसीबीच्या सहाय्याने सदर व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आले.

एसडीओ बारामती (पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार पूरात 40 लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे, तर पूरग्रस्त निमगाव केतकीमध्ये 15 लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे बचावकार्य सुरू आहे. तसेच इंदापूरजवळ दोन जण दुचाकीसह वाहून गेले असताना त्यांचेही बचाव करण्यात आले आहे. यासह बारामतीच्या निवासी भागात बांधलेल्या घरातही पाणी शिरले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने उत्तर कोकणात पावसासंदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे. ज्यात मुंबई आणि ठाणेही आहेत. प्रशासनातर्फे बचाव पथके ठिक ठिकठिकाणी तैनात केली जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here