मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

मुंबई | महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा (Telangana), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पाऊस पडत आहे. यापूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच ही परिस्थिती पुढील चार-पाच दिवस राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती.

मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडी मुंबई यांनी वर्तवला आहे. आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K.S. Hosalikar) यांनी ट्वीट करत माहिती दिली की, “नुकत्याच प्राप्त झालेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघरसह उत्तर कोकणात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काळजी घ्या”.

तसेच सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता असून तिथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथेही मुसळधार पाऊस सुरु असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच राहील असे सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like