धक्कादायक! प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुझफ्फरनगर जिल्ह्यात सिव्हिल लाईन परिसरातील जनकपुरी परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. मृत महिलेचे नाव पूजा असे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सहा महिन्यापूर्वी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनकपुरी परिसरातील दीपक सोबत पूजा चे लग्न झाले होते. पूजाचे लग्नापूर्वीच टिटवी पोलीस स्टेशन परिसरातील सोनू नावाच्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. पूजाच्या लग्नानंतर देखील हा तरूण पूजाला सतत त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून पूजाने हे (suicide) पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत पूजाच्या आईने सांगितले की, पाच ते सहा महिन्यापासून पूजाला हा मुलगा फोन करून त्रास द्यायचा. याबाबत टिटवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरुणाने आमच्या घरावर देखील एकदा गोळीबार केला होता. यावेळी या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्याला पुन्हा का सोडले ही बाब समजली नाही. जर पोलिसांनी त्याला सोडले नसते तर आज माझ्या मुलीचा जीव गेला नसता असा आरोप देखील त्यांनी टिटवी पोलिसांवर केला आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर