सातारा जिल्ह्यात 2024 ला अजित दादांना धक्का बसेल : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आमचा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही. सातारा जिल्ह्यातील काही राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आम्हांला गद्दार म्हणायचं, हे सरकार लवकर पडणार म्हणायचं आणि त्यांची माणसं थांबवायचं काम अजित दादा प्रमाणिकपणे करतायत. पण त्यांनाही 2024 च्या निवडणुकीत अजित दादांना “दूध का दूध आणि पाणी का पाणी” पहायला मिळेल. एकेकाळी जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता, तेव्हा 8 पैकी 7 आमदार राष्ट्रवादीचे होते. आता 4 आमदार शिवसेना- भाजपाचे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी निम्म्यावर आलेली आहे. आम्ही जास्त बोलणार नाही, परंतु 2024 साली वेगळं चित्र पहायला मिळेल, अन् अजित दादांना धक्का बसेल, असा सूचक इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

सातारा येथे माध्यमांशी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी संवाद साधला. यावेळी अजित दादा व राष्ट्रवादी काॅंग्रेसला सडेतोड उत्तरे दिली. माॅलमध्ये वाईन विक्रीवर निर्णय किंवा संकेत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने शिवतीर्थावर शिवसेनेला दिलेली परवानगी याविषयी ही भाष्य केले. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शाॅप मॉलमध्ये वाईन विक्री संदर्भात राज्यात गदारोळ उठणारे वक्तव्य मी केलंल नाही. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगत मागच्या सरकारने हा घेतलेला निर्णय यावर जनतेचा अभिप्राय जनतेचे मत मागण्यासाठी हे ओपन पब्लिक साठी यावर लोकांच्या हरकती आपण मागवला आहेत. याबाबतचा अहवाल जेव्हा माझ्याकडे येईल, त्यावेळेस मी स्वतः त्यावर माझं मत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर करून मग आम्ही मिळून निर्णय घेऊ, असे सांगत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगत या विषयावर तूर्तास तरी पडदा टाकला आहे.

दसरा मेळाव्याचा कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो
आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थाची परवानगी मागितली होती आणि ठाकरे गटाने ही याच ठिकाणी मागितली होती. ती परवानगी आम्हाला न मिळता ठाकरे गटाला मिळाली आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने दसरा मेळाव्याचे आयोजन करू. आम्हाला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचाराचं सोनं लुटण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने आम्ही दसरा मेळाव्याला लुटणार आहे. आजच्या दसरा मेळाव्याच्या निकालाबाबत कोर्टात जाण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून बिकेसीच्या मैदानाची मागणी केली आहे. तेथे जोरदार मेळावा घेण्याची आमची तयारी सुरू झाली असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.