लातूर : अहमदपूर तालुक्यातील किनगाव गावात येथील रहिवासी असलेल्या एका महाविद्यालयीन तरूणीने लातुरातील आनंद नगर भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ एकच उडाली आहे. ही घटना रविवारी घडली.
आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेटसवर एक व्हिडिओ अपलोड केला. आणि त्यात ती म्हणाली ‘मी कंटाळले आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये’. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक विकास तिडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सदर तरुणीचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे.