नवी दिल्ली । अनेकदा नोकरदारांचे पैसे पीएफ खात्यात पडून असतात. याचे कारण असे की, नोकरी बदलल्यावर पीएफ नवीन नोकरीच्या ठिकाणी एकतर लिंक केलेला नसतो किंवा अपडेट केलेला नसतो. त्यामुळे नवीन नोकरीबरोबर नवीन पीएफ खाते तयार होते आणि जुने आहे तसेच राहते. त्यामुळे त्यात पडून असलेला पैसाही अडकला जातो. अशी अनेक पीएफ खाती आहेत. जर तुमच्यासोबतही असे काही झाले असेल तर आम्ही तुम्हाला ते दूर करण्याचा सोपा उपाय सांगत आहोत.
काही वेळा जुन्या नोकरीच्या पीएफ खात्याचा खाते क्रमांकही लक्षात राहत नाही. जर तुम्हाला ते पीएफ खाते तुमच्या नवीन UAN शी लिंक करायचे असेल किंवा त्यातून पैसे काढायचे असतील तर आता तुम्ही हे काम सहजपणे करू शकता.
इनऑपरेटिव्ह अकाउंट
जेव्हा 36 महिन्यांपर्यंत पीएफ खात्यात कोणतीही रक्कम टाकली जात नाही. या कालावधीत, त्या खात्यात असलेली रक्कम काढण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी कोणताही अर्ज दाखल केला नसला तर त्या खात्याला इनऑपरेटिव्ह अकाउंट असे म्हणतात. अशी खाती देखील इनऑपरेटिव्ह अकाउंटमध्ये समाविष्ट केली जातात ज्यांमधून तुम्ही पीएफ काढण्यासाठी अर्ज केला होता, मात्र काही कारणास्तव तो फेल झाला आणि त्यानंतर तुम्ही ते काढण्याची तसदी घेतली नाही.
तुमचे एखादे इनऑपरेटिव्ह अकाउंट असल्यास किंवा असे म्हणा की, तुमचे पीएफ खाते आहे, ज्यामध्ये वर्षानुवर्षे कोणतेही योगदान नाही. एवढेच नाही तर तुम्हाला त्याचा खाते क्रमांक देखील आठवत नसेल तर अशा खात्यांमधून तुम्ही पैसे कसे काढू किंवा ट्रान्सफर करू शकता हे जाणून घ्या.
बंद असलेल्या पीएफ खात्यातून पैसे कसे काढायचे ?
अशी खाती सेटल करण्यासाठी EPFO ने हेल्पडेस्क सुरू केला आहे. हे डेस्क तुम्हाला अशा प्रकरणांचे सेटलमेन्ट करण्यास मदत करते. यासाठी सर्वप्रथम EPFO च्या वेबसाइटवर पोहोचा. येथे ‘Our services’ मध्ये ‘For employees’ पर्याय निवडा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Services नावाचा टॅब उघडेल.
या टॅबमध्ये शेवटी तुम्हाला Inoperative A/c Helpdesk चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला ‘First time user Click here to Proceed’ या टॅबवर क्लिक करावे लागेल. इथे पहिल्यांदाच येत असाल तर तुमच्या समोर एक मेसेज बॉक्स उघडेल. येथे तुम्हाला तुमचा मुद्दा जास्तीत जास्त 1000 शब्दांमध्ये मांडावा लागेल. यामध्ये तुम्ही तुमचे पीएफ खाते किती जुने आहे आणि काय समस्या आहे याची माहिती देऊ शकता.
तुम्ही नेक्स्ट बटण दाबताच, तुमच्याकडे या खात्याबद्दल असलेली कोणतीही माहिती नवीन विंडोमध्ये एंटर करा. ही माहिती तुमचे पीएफ खाते शोधण्यात मदत करेल. पुढे गेल्यावर, तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक याशिवाय इतर तपशील भरणे बंधनकारक नाही. EPFO नुसार, येथे दिलेल्या माहितीच्या आधारे, EPFO हेल्पडेस्क तुमच्याशी संपर्क साधेल.
तुमच्या मोबाईल नंबरवर एक पिन येईल. एकदा तुम्ही ते एंटर केल्यानंतर, तुम्हाला एक रेफरन्स आयडी पाठवला जाईल. यामुळे पुढे जाऊन या प्रकरणाची स्थिती काय आहे, याचा मागोवा घेता येणार आहे. अशा प्रकारे तुमचा अर्ज सादर केला जाईल. EPFO आपल्या स्तरावर खात्याची माहिती गोळा करेल आणि तुमच्याशी संपर्क साधेल
तुम्ही रेफरन्स आयडी वापरून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. यासाठी तुम्हाला “First time user Click here to Proceed” निवडले होते तेथे पोहोचणे आवश्यक आहे. येथे पोहोचल्यानंतर, तुम्हाला आता ‘Existing User Click here to view status’ वर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि तुमच्या इनऑपरेटिव्ह अकाउंटची स्थिती कळेल.