धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने सपासप वार

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदूर : वृत्तसंस्था – एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने तरुणीला धडा शिकवण्याच्या हेतूने तिच्या घरात घुसून तिच्यावर ब्लेडने वार केले आहेत. या तरुणाने ब्लेडच्या साहाय्याने तरुणीच्या चेहऱ्यावर वार केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
इंदूरमधील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या अकरम नावाच्या तरुणाचं एका तरुणीवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम होतं. मात्र तरुणी त्याला कुठलाही प्रतिसाद देत नव्हती. या तरुणीचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र तरीदेखील आरोपी अकरम तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिला भेटण्याचा तो प्रयत्न करत असायचा. तिने पतीला सोडून आपल्यासोबत यावं, अशी मागणीदेखील आरोपीने तिच्याकडे केली होती. मात्र त्याच्या या वर्तनाकडे तरुणी दुर्लक्ष करत होती.

तरुणी प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आल्यावर वेडापिसा झालेला हा आरोपी तरुण ब्लेड घेऊन थेट तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर हल्ला केला. सर्वप्रथम त्याने तिच्या गालांवर ब्लेडने सपासप वार केले. नेमकं काय घडतंय, हे कळण्यापूर्वीच तरुणी गंभीर जखमी झाली. तिचा आरडाओरडा ऐकूऩ घरातील आणि आजूबाजूचे धावून येत असल्याचं पाहून या आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर या तरुणीच्या कुटुंबीयांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला अटक केली आहे.