धक्कादायक ! प्रेमभंग झाल्यानं फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे . मृत तरूणाच्या प्रेयसीने मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्याअगोदर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण प्रेम प्रकरणातुन आत्महत्या करत असल्याचं सांगितले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अंकुश नामदेव पवार असे आहे. तो जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावात कुटूंबातसह राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने मृत अंकुश हा चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कल्याण येथे आला होता. कल्याण मधील एका खाजगी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून नोकरी करत होता.

यादरम्यान एका घटस्फोटीत तरुणीशी त्याची ओळख झाली होती. यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले होते. अंकुशला या तरूणीशी लग्न करायचे असल्याने तो पगाराचे पैसे तिच्याकडे जमा करत होता. मात्र तरुणी हे पैसे स्वतःच्या मौजमजेसाठी वापरत होती. हि गोष्ट अंकुशला समजल्यावर त्यांच्यात खटके उडू लागले. यावेळी प्रेयसीने तू मर जा , मला तुझी गरज नाही असे सांगितले. हे शब्द त्याच्या जिव्हारी लागल्याने त्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे.