‘माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे…’ स्टेटस ठेवत तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी या मृत तरुणाची आई त्याला उठवायला गेली तेव्हा तिला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हाट्सअ‍ॅपवर ‘मी जातोय…माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे’ असं स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे.

या 24 वर्षीय मृत तरुणाचे नाव ओमप्रकाश मेघवाल असे आहे. हा तरुण कस्बे येथे ई-मित्र दुकान चालवत होता. सोमवारी रात्री तो खोलीत झोपण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने रात्री जवळपास 12 वाजून 4 मिनिटांनी व्हाट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवले आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी या तरुणाची आई त्याला उठवायला गेली तेव्हा ओमप्रकाश खोलीत फाशी लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी पोस्टमार्टम करुन मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला. मृत तरुणाकडे कोणतीही सुसाइट नोट मिळालेली नाही. परंतु कुटुंबियांनी पत्नीसोबत सुरू असलेल्या वादामुळे मानसिक तणावामुळे आत्महत्या केली असावी असे सांगितले. पोलीस सध्या या तरुणाने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचा शोध घेत आहेत.

Leave a Comment