डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू, सातारा जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। सातारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घडली आहे. एक २२ वर्षीय तरुण तडफडत मृत्यूशी झुंज देत असताना सिव्हिल मधील डॉक्टर आणि परिचारिका मात्र मध्यरात्री गाढ झोपेत होते.

अखेर नातेवाइकांनी परिचारिकांना झोपेतून उठवून तरुणावर उपचार करण्यास सांगितले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. संबंधित तरुणाने अक्षरश: तडफडून अखेर प्राण सोडले. या धक्कादायक प्रकारामुळे नातेवाइकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणावर अजूनही कुठल्याही अधिकाऱ्यांकडून कारवाई किंवा चौकशीच्या आदेशाची माहिती मिळालेली नाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here