साताऱ्यातील युवकाचा मृत्यू : कूल्लू- मनालीत पॅराग्लायडिंग दरम्यान दुर्घटना

Paragliding accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना युवकाचा अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका 30 वर्षीय पर्यटकाचा शेकडो फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने खाली पडून पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेला युवक हा सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सूरज शहा असे या दुर्देवी युवकाचे नाव आहे. सुरज मित्रांसोबत ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कुलू- मनालीला गेला होता. सुरज सुमारे 800 फुटावरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येते.

सूरज आपल्या मित्रांसह शनिवारी पॅराग्लायडिंग करण्यासाठी डोभी येथे दाखल झाले होते. डोभी येथून पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच सूरजचा सेफ्टी बेल्ट खुला झाला. त्यानंतर तो खाली कोसळला. स्थानिकांनी तातडीने त्याला आणि पायलटला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.