छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी युवक राष्ट्रवादीकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन समाजात व्देषभावना निर्माण करणारे वक्तव्य करुन दोन्ही समाजाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे,अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी आज सांगली येथे व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस सांगली जिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करुन निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते नसल्याचे सांगितले असतानाही राज्यपालांसारखी जबाबदार व्यक्ती दोन समाजात व्देषभावना निर्माण करत असल्याने या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवकचे निरिक्षक अरुण हसबे, शरद लाड, राजू जानकर, भरत देशमुख, विश्वास पाटील, किसन जाणकर, मोहन पाटील, विजय पाटील, अजित दुधाळ, संग्राम जाधव, शिवाजी माळी, हर्षद बागल, मोहन खोत, आदिंसह युवक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment