जवान होण्याचे स्वप्न राहिले अधुरे! सैन्य भरतीची करणाऱ्या योगेशने उचलले ‘हे’ पाऊल

Suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पैठण : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द या ठिकाणी राहणाऱ्या योगेश लक्ष्मण वाघ या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. योगेश लक्ष्मण वाघ हा सैन्य दलाच्या भरतीची तयारी करत होता. त्याने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. योगेश हा गेल्या दोन वर्षांपासून सैन्य दलाची तयारी करत होता. त्यामुळे तो दररोज पहाटेच्या दरम्यान आपल्या शेताकडे जाऊन तयारी करत असे. आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शेताकडे प्रॅक्टिससाठी गेला होता. मात्र 8 वाजले तरीही तो घरी परतला नाही म्हणून घरच्यांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली असता योगेशने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचे आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे बीट जमादार अन्नासाहेब गव्हाणे, पवन चव्हाण, किशोर शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उतरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. यानंतर वैद्यकीय अधिकारी साबळे यांनी पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची (suicide) नोंद करण्यात आली असून पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!