सर्वात मोठा प्रश्न युवा रोजगाराचा – राहुल गांधी

0
71
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी | युवा रोजगार जितका महत्वाचा प्रश्न आहे तेवढाच शेतकऱ्यांचा आहे. या सरकारने प्रत्येक प्रश्नावर निराशा केली आहे. पुढचं सरकार हे कॉंग्रेस चं सरकार असेल आमच्या सरकार काळात या सगळया समस्यापासून मुक्त करू. या फसव्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या आणि कॉंग्रेस ला विजयी करा अस आवाहन राहुल गांधी यांनी धुळयातल्या सभेत केलं.

ते धुळे येथील सभेत बोलत होते ते पुढे म्हणाले भाजप चा मंत्री लोकसभेत म्हणतो १ दिवसाला १ लाख नोकऱ्या आम्ही निर्माण करत आहोत. आणि दूसरीकड़े प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेक इन इंडिया च्या नावाने कार्यक्रम करत फिरत असतात. १ लाख हा आकड़ा आपल्या देशाची बेरोजगारी कमी करण्यास पुरेशी नाही. तो आकड़ा वाढवण्यासाठी चीन तयार करत असलेल्या वस्तु आपण घेता कामा नये आपणच आपल्या देशांत रोजगार निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे तशी यंत्रणा हवी आणि वस्तु निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच भारत मेड इन इंडिया बनेल. अस राहुल म्हणाले.

आपल्याला प्रतिस्पर्धी चीन च्या मुकाबल्यात पुढे जायचं आहे. चीन दिवसाला ५० लाख नोकऱ्या निर्माण करत असा दावा ही राहुल यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here