सातारा | आमिर इनामदार
जिल्ह्यातील एका युवकाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर देशातील बेरोजगारांचीही राष्ट्रीय नोंदणी व्हायला हवी, त्यांच्या रोजगरावरही गांभीर्याने विचार व्हायला हवा यासाठी आवाहन केलं आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही नोंदणी व्हावी अशी इच्छा अमीर इनामदार यांनी आपल्या आवाहनातून व्यक्त केली आहे.
पाहुयात काय आहे हे आवाहनपत्र
आजच्या भारतीय बेरोजगार तरूणाईला कळकळीचं आवाहन…
आज गावागावातून बेरोजगार असंख्य तरूणाई निर्माण झालीय यावर उपाययोजना काय असाव्यात यासाठी काय धोरण निर्मिती व्हावी यासाठीच,
माझ्या तमाम बंधू-भगिनी, मित्र-मैत्रिणींना आवाहन
होय मी बेरोजगार या आशयाखाली एक ‘वेदना पत्र’ शासन-प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधींना लिहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रोजगारासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासनाकडे वारंवार याचा पाठपुरावा केला नाही तर या विषयावर मार्ग निघणं कठीण आहे. बाह्य घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी NRC सारख्या योजना राबविल्या जात असताना देशातील सक्षम युवकांसाठी काही रचनात्मक काम करायला हवं हे शासनाला सांगायची आता गरज निर्माण झाली आहे. आपण शिक्षण घेऊनसुद्धा रोजगार मिळणं अवघड असेल तर यावर उपाय शोधलाच पाहिजे आणि यासाठी तुम्ही-आम्ही धडपडनं गरजेचं आहे.
“बेरोजगार एकत्रित नोंदवही”
#????Unemployable Collection Register????
माझ्या-वस्ती/वाडी/गाव/शहर मधील बेरोजगार तरूणाईचं एकत्रितपणे संशोधन आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजनांची निर्मिती-प्रयत्न
टप्पा पहिला:-
????गाव-सरपंच-ग्रामसेवक
????शहर-नगराध्यक्ष-मुख्याधिकारी
????महानगर-महापौर-आयुक्त
टप्पा दुसरा:-
????स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रतिनिधी-ग्रामीण
????स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रतिनिधी-शहरी
टप्पा तिसरा:-
????राज्याचे महामहिम राज्यपाल यांना सविनय वेदना पत्र
????राज्याचे मुख्यमंत्री यांना सविनय वेदना पत्र
????देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना सविनय वेदना पत्र
????देशाचे पंतप्रधान यांना सविनय वेदना पत्र
लिहिणारे कोण असावेत…?
– सुशिक्षित बेरोजगार
– बेरोजगारीचा सामना करणारे अशिक्षीत पण कुशल कामगार
????पत्राचा आशय व सोबत जोडावयाची कागदपत्रे…
– ज्या पात्रतेवर नोकरी मिळालीय
ते शैक्षणिक पात्रता पुरावा-प्रमाणपत्र
– नोकरी आवेदन पत्र ज्यावर दिनांक स्पष्ट उल्लेखित असावी [संबंधित शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्था नावाचा तपशील]
– बेरोजगार झालेला दिनांक-
लेखी-घोषित/पूर्वसूचना/अलिखित-अचानकपणे कमी केले
याबाबतचे कारण
– अनुभव प्रमाणपत्रे/ओळखपत्र
असे सर्व एकत्रितपणे लिखित स्वरूपात असावे. पत्र नमुना टप्पा ०१ ते ०३ मधील सर्वांना लागू
दि. / / २०२०
प्रति,
मा.सरपंच
गाव-
ता-
जि.
विषय – “होय मी बेरोजगार…”
अर्जदार – संपूर्ण नाव व शिक्षण
महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणांस नम्र निवेदन करतो की, मी दिनांक- / / २०… पासून …(नोकरी ठिकाण नाव) इथे काम करत होते/होतो परंतू दि / / २०… रोजी मला काढण्यात आले. सोबत माझ्या काम केलेल्याचे पुरावे पाठवत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती.
आपलाच..
मी स्वविचाराने लिहिलेल्या आवाहनाला वाचून,मीमांसा करा अंलबजावणीसाठी साथ द्या. सहकार्य करा. प्रतिक्रिया द्या.
अमीर इनामदार,
8999270633
amirinamdar05gmail.com
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा-
काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेटप्रजासत्ताक म्हणजे नक्की काय?
पाकिस्तानी गायक अदनाम सामीच्या पद्मश्रीला मनसेचा विरोध; पुरस्कार रद्द करण्याची मागणी
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यदभाईंना पद्मश्री पुरस्कार जाहीर