” टॉक विथ कलेक्टर ” ला तरुणाईचा उदंड प्रतिसाद..

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

न्यू आर्टस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या भरघोस गर्दीत रंगला ‘टॉक विथ कलेक्टर’ कार्यक्रम

अहमदनगर प्रतिनिधी

निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएमची पारदर्शकता अशा एक ना अनेक विषयांवर आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकांचे, प्रश्नांचे निराकरण करीत या निवडणूकीच मतदानाचा हक्क बजावण्यास विसरु नका, असे आवाहन त्यांनी केले. न्यू आर्ट्स महाविद्यालयातील टॉक विथ कलेक्टर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य श्री. झावरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार उन्मेष पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

लोकशाही मध्ये निव़डणूक प्रक्रिया ही खूप मोठी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुका हा त्यातील महत्वाचा भाग आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सुरुच असते. मतदार याद्या तयार करणे, खूप महत्वाचे असते. ही प्रत्येक पात्र मतदारांची जबाबदारी आहे, की त्यांनी मतदार यादीत त्यांचे नाव नोंदवले पाहिजे. मतदानाचा हक्क हा महत्वाचा आहे. त्याचा योग्य तो उपयोग केला पाहिजे.

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हा महत्वाचा घटक असल्याचे ते म्हणाले.सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करणे गरजेचा आहे. निवडणूक काळात सोशल मीडियावरुन होणार्‍या जाहिराती आणि प्रचाराकडे निवडणूक यंत्रणेचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर, या माध्यमाचा जपून वापर करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.