नवी मुंबईत लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याने तरुणांची बाऊन्सरला बेदम मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लाउंज आणि हुक्का पार्लरमुळे तरुणांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. वाशी येथील सतारा प्लाझा हे हुक्का पार्लर आणि लाऊंजचे हब बनले आहे. या ठिकाणी असलेल्या ऑरेंज मिंट या लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याने आठ ते दहा जणांच्या टोळीने लाऊंजच्या बाहेर बाऊन्सरला (bouncer) बेदम मारहाण केली आहे. ही सर्व घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात आले नाही.

बाऊंसरने तरुणांना आत जाण्यास मनाई केली
मारहाण करणारे सर्व तरुण मूळचे कोपरखैरणे आणि पुणे येथील रहिवासी आहेत. लाऊंजमध्ये गर्दी असल्याने या तरुणांना आतमध्ये जाण्यास बाऊंसरकडून (bouncer) मनाई करण्यात आली. याचा राग अनावर झाल्याने या तरुणांनी बाहेर असलेल्या सामानाची तोडफोड करत लाऊंजच्या बाऊन्सरला (bouncer) बेदम मारहाण केली. हि संपूर्ण मारहाणीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

सांगलीत गर्दुल्यांचा शिवभोजन केंद्रावर धिंगाणा
सांगलीतील मिरज शहरमधील एसटी स्टॅन्ड परिसरातील गर्दुल्यांनी शिव भोजन केंद्रावर धिंगाणा घातला आहे. यामध्ये त्यांनी केंद्राची तोडफोड करून तेथील केंद्रचालकांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच धमकीसुद्धा दिली. या नशेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन, RBI ने वाढवली मर्यादा

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज !!!

IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

खुशखबर !!! Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही करता येणार पेमेंट

Leave a Comment