हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्ही देखील YouTube कंटेंट क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. भारतात, लोक सहसा त्यांच्या व्हिडिओंना अधिक व्ह्यूव्ज मिळविण्यासाठी YouTube वर क्लिकबेट म्हणजेच फसव्या थंबनेलचा वापर करतात. परंतु युट्युबने असे व्हिडिओ न कळवता डिलिट करणार असल्याचे सांगितले.
Google च्या मालकीच्या YouTube ने घोषणा केली आहे की ते क्लिकबेट थंबनेल आणि शीर्षक असलेल्या व्हिडिओंवर कठोर कारवाई करेल. ही मोहीम भारतात सुरू केली जाईल आणि विशेषत: ब्रेकिंग न्यूज किंवा वर्तमान घटनांवर आधारित व्हिडिओंवर लक्ष केंद्रित केले जाईल. व्हिडिओ कंटेंटबद्दल दर्शकांची दिशाभूल होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. YouTube ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की भारतात क्लिकबेट थंबनेल आणि शीर्षकांवर कठोर कारवाई केली जाईल. “अति क्लिकबेट” ची समस्या सोडवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा व्हिडिओचे शीर्षक किंवा थंबनेल त्याच्या विषयाशी जुळत नसल्यास असे व्हिडीओ डिलिट करण्यात येणार आहेत.
प्रेक्षकांची दिशाभूल करण्यास मनाई
YOUTUBe ने सांगितले आहे की; अशा सवयींमुळे दर्शकांना विश्वासघात झाल्याची भावना येऊ शकते. विशेषतः जेव्हा ते महत्त्वाच्या किंवा वेळ-संवेदनशील माहितीसाठी प्लॅटफॉर्म वापरतात. ही समस्या कमी करण्यासाठी, YouTube या धोरणाचे उल्लंघन करणारी सामग्री काढण्यास सुरुवात करेल.
सुधारण्यासाठी वेळ मिळेल
सुरुवातीला प्लॅटफॉर्म अशा व्हिडिओंवर स्ट्राइक जारी करणार नाही. निर्मात्यांना या नवीन नियमांनुसार त्यांची सामग्री संपादित करण्यासाठी वेळ मिळेल याची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे, परंतु लवकरच, YouTube हे धोरण नवीन व्हिडिओ अपलोडसाठी प्राधान्याने लागू करेल.