Youtuber Income | विविध संकेतस्थळांमुळे जग जवळ आले आहे. हे विश्वची माझे घर असे वातावरण सध्या असून अनेक जण ऑनलाईन माध्यमे वापरून आणि स्वत:चे कौशल्य वापरत चांगली कमाई करीत आहेत. सोशल माध्यमांमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर असे अनेक पर्याय आहेत, जे लोकांना प्रसिद्धी मिळवून देतात. तुम्हाला प्रसिद्धीसोबत पैसा कमवायचा असेल तर युट्यूब हे सोशल माध्यम चांगला पर्याय आहे. या ऑनलाईन मिडीयावर तुम्ही विविध माहिती देणारे व्हिडीओ अपलोड करून जगभर पोहोचू शकता, ऑनलाईन पैसा कमवू शकता. आता शहरांतीलच नव्हे तर गावाकडील लोकही Youtube युट्यूबवर चांगली कमाई करीत आहेत. युट्यूबर्स नेमकी कशी करतात ऑनलाईन कमाई हे आपण जाणून घेणार आहोत.
सध्याच्या काळात प्रत्येकजण कोणता ना कोणता आवडता व्हिडीओ पाहत असतो. व्हिडीओ पाहत असताना त्या व्हिडीओला किती लाईक मिळतात, किती लोक तो व्हिडीओ पाहतात, यावर व्हिडीओचे मानांकन किंवा रेटिंग्ज केले जाते. मनोरंजक व्हिडीओला जास्त लोक पसंत करतात. जगातील अनेक देशांतील लोक त्यांचा आवडता व्हिडीओ किंवा त्यांच्या आवडत्या विषयाचे व्हीडीओ पहात असताना त्यांना माहित नाही की, ज्याने व्हिडीओ अपलोड केला आहे त्याला आपण पैसा मिळवून देत आहोत. व्हिडीओला मिळणाऱ्या व्ह्यूजवरच युट्यूब युट्यूबरला पेमेंट करीत असते. परंतु व्ह्यूजमुळे पेमेंट ठरवले जाते कसे ते आपण पाहणार आहोत.
युट्यूबवर अपलोड होणाऱ्या व्हिडीओ जास्त लोकांनी पाहिला तर त्यावर जाहिराती दिसू लागतात. जाहिरातींमधून कमाई हवी तर कंटेंट क्रिएटर्स एडसेन्सचे खाते उघडतो. ते आवश्यक असते. ज्या कंटेंट क्रिएटर्सनी मॉनिटायझेनचे नियम सिद्ध केले आहेत, त्यांना एडसेन्ससवारे युट्यूब पेमेंट करते. Youtube क्रिएटर्सच्या व्हिडीओचे विविध विषय असतात. इंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, विविध लोकोपोयागी योजनांची माहिती असे अनेक विषय असतात. वेगवेगळ्या श्रेणी विषयानुसार ठरतात. या श्रेणी विभागल्या जातात आणि कंटेंट क्रिएटर्सच्या खात्यात त्यानुसार रक्कम जमा केली जाते. यात कंटेंट क्रिएटरला 1 मिलियन (10 लाख व्यूज) जर मिळाले तर ते पेमेंट जास्त असते. युट्यूब अशा कंटेंट क्रिएटरला 10 लाख व्ह्यूजचा निकष पूर्ण केला तर 100 डॉलर वा त्यापेक्षा जास्त पेमेंट करू शकते. Cost per Click-CPM आणि Click Through Rate-CTR या मेथडनुसार कंटेंट क्रिएटरला पेमेंट मिळते.
व्हिडीओला किती प्रेक्षकांनी क्लिक करून पाहिले म्हणजे CTR ची प्रोसेस केली यावरही कंटेंट क्रिएटरचे पेमेंट अवलंबून असते. अपलोड केलेल्या व्हिडिओवर प्रेक्षकांनी क्लिक करून व्हिडीओ पाहिला तर म्हणजे क्लिक थ्रू रेट प्रोसेस केली तर आणि ती आकडेवारीत 2 टक्के असली तर 100 लोकांमधील दोघांनी व्हिडीओदरम्यानच्या जाहिरातीवर क्लिक केले असे मानले जाते. कंटेंट क्रिएटरच्या व्हिडीओवर जेवढे क्लिक थ्रू रेट आहेत, त्यावर त्याला पेमेंट मिळण्याची शक्यता असते. युट्यूब तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी), बिझनेस आणि फायनान्स या विषयाचे कंटेंट देणाऱ्या युट्यूब चॅनलला आरपीएम मिळत असतात. युट्यूबने कंटेंट क्रिएटरला मिळणाऱ्या रकमेचा आकडा स्पष्टपणे जाहीर केलेला नाही. परंतु युट्यूब हे माध्यम कुशल आणि लोकप्रसिद्ध असलेल्या कंटेंट क्रिएटरच्या व्हिडीओला चांगला पैसा मिळवून देणारे साधन आहे, हे निश्चित !