तेवातियाचे एकाच ओव्हर मध्ये 5 सिक्स !! युवराज म्हणतो….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील पंजाब विरुद्ध राजस्थान सामना खूपच रोमांचक झाला. पंजाबने ठेवलेलं 224 धावांच आव्हान राजस्थानने शेवटच्या षटकात पार केला. शेवटच्या तीन ओव्हर मध्ये राजस्थान ला तब्बल 51 धावांची आवश्यकता होती. तेव्हाच राहुल तेवातीया नावाचं वादळ आलं, आणि पंजाबचा सुफडासाफ झाला.

मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं. आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी तेवतियाने बरोबरी केली.

तेवातियाने एकाच षटकात पाच षटकार लगावल्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंगने एक मजेशीर ट्विट केलं. “मिस्टर राहुल तेवातिया…. असं करू नका… ओव्हरमधल्या त्या एका चेंडूवर षटकार न मारल्याबद्दल धन्यवाद! सामना अत्यंत अप्रतिम झाला. राजस्थान… तुमचं मनापासून अभिनंदन. मयंक अग्रवाल आणि संजू सॅमसन… तुमच्या खेळी अप्रतिम होत्या”, असे ट्विट त्याने केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like