औरंगाबाद जि.प. स्थायी समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने

औरंगाबाद | जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे कोरोनाचे नियम पाळत ही बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या स्थायी समितीच्या बैठकीत गेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम ठेवत जमाखर्च आज मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत इतर रस्ते विकास कामे याबाबत चर्चा करण्यात आली. कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनानाही आरोग्य विभागाला सदस्यांनी केल्या आहेत. दिवसेंदिवस प्रत्येक गावामध्ये कोरोना वाढत आहेत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कोरोना महामारीमुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. बऱ्याचशा पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी आरोग्य विभागाने उपायोजना करून ग्रामीण जनतेमध्ये जनजागृती निर्माण करावी, अशी चर्चाही आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे महिला व बालकल्याण अधिकारी समाज कल्याण अधिकारी तसेच पदाधिकारी ऑनलाइन बैठकीसाठी उपस्थित होते

You might also like