मला प्रसिद्धीची गरजच काय; तृप्ती देसाई यांचे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला खणखणीत प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “मला प्रसिद्धीची गरजच काय ! मला ऑलरेडी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली आहे.म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी काहीही बोलत बसू नये अशा कडक शब्दात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना प्रतिक्रिया दिली.

परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी पीडित महिलेसह पत्रकार परिषद घेत केला होता. तसेच विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली होती. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “तृप्ती देसाई या प्रसिद्धीत राहण्यासाठी हा स्टंट करीत असल्याची टीका केली होती. यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

देसाई पुढे म्हणाल्या की “राष्ट्रवादीच्या लोकांनी सुरवातीला धनंजय मुंडे प्रकरणावर असचं केलं.त्यानंतर मेहबुब शेख प्रकरणावर देखील असचं केलं.या लोकांनी कधीतरी आपली माता,बहीण त्या पीडित महिलेच्या जागी आहे असा विचार करून या प्रकरणावर भाष्य करावे असे देखील त्यांनी म्हटले आहे.तसेच राजेश विटेकर यांनी पत्राद्वारे जो खुलासा केला आहे.तो फक्त त्या महिलांची बदनामी करणारा आहे.त्यात कुठेही विटेकरांनी स्वतःची बाजू मांडलेली नाही. विटेकरांना एवढीच स्वतःची बाजू मांडायची इच्छा होती तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडायची ना ! की फक्त वकिलाने लिहून दिलेले पत्र सोशल मीडियावर पब्लिश करून बाजू मांडायची असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.

You might also like