हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑर्डर केलेलं जेवण तरूणीपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. यानंतर त्या तरूणीनं ती ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतरही थोड्या वेळानं तो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या तरूणीच्या घरी पोहोचला. परंतु तरूणीनं ते जेवण घेण्यास नकार दिला तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयला राग अनावर झाला आणि त्यानं त्या तरूणीच्या नाकावर बुक्का मारला. हा व्हिडीओ गेल्या 2-3 दिवसांपासून व्हायरल होत आहे. मात्र आता या व्हिडिओमागे एक वेगळंच सत्य समोर आलं आहे. Zomato च्या डिलिव्हरी बॉयने या तरुणीवर हल्ला केला नसून या तरुणीने स्वतः नाकावर बुक्क्या मारून डिलिव्हरी बॉयलाही मारहाण केल्याचा आरोप खुद्द डिलिव्हरी बॉयना केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली केल्यानंतर त्याने ही माहिती दिली आहे.
ऑर्डर कन्सल केल्यानंतर डिलिव्हरी बॉयने नाकावर बुक्का मारून जखमी केल्याचा आरोप बंगरुळमधील एका तरुणीने केला होता. या हल्ल्यानंतर तरुणीच्या नाकातून रक्तही वाहू लागल्याचा दावा तरूणीनं केला होता. त्यानंतर तिनं याचा व्हिडीओ बनवून लोकांना याबाबत माहिती दिली. हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मॉडेल असलेल्या हितेशा चंद्राणीला कामराजने बुक्का मारला नाही, उलट कामराज येताच हितेशानेच त्याच्यावर हल्ला केला. त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. कामराजला त्यांनी चपलेने मारण्यास सुरुवात केली. याचवेळी तिने तिच्यानाकावर मारून घेतले. तिच्या हातातील अंगठीमुळे नाकावर जखम झाली आणि रक्त येऊ लागले. याचा आळ तिने आपल्यावर घालत आपणच हल्ला केल्याचे आरोप केल्याचे कामराजने पोलिसांना सांगितले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group