कंगनाला भोवली ट्विट करायची घाई; ‘त्या’ अक्षम्य चूकीमुळे नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर

मुंबई । कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बेफाम ट्विट करते आहे. तिच्या ट्विटला जणू काही राष्ट्रीय बातमीचा दर्जा मिळत आहे. याची कल्पना तिला आहे. पण आता ट्विट करायची हीच घाई तिला संकटात नेणार आहे. कारण घाईत टाईप करण्याच्या नादात ती अक्षम्य चुका करू लागली आहे. अशीच एका चुकीमुळे ती नेटकऱ्यांच्या तावडीत सापडली आहे.

कंगनाने साधारण काही तासांपूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये ही इंडस्ट्री काही करण जोहर वा त्याच्या वडिलांची नसून ती चक्क बाबासाहेब फाळके यांनी सुरूवात करून त्यात इंडस्ट्रीचे अनेक घटक येतात असं म्हटलं आहे. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके आहेत. पण कंगनाने नावात केलेल्या या चुकीमुळे अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड ठेवली आहे.

भारताला बाबासाहेब आणि दादासाहेब ही दोन्ही नावं नवी नाहीत. ही नावं अत्यंत अदबीने घेतली जातात. याच नावात कंगनाने घोळ केला आहे. याबद्दल बोलताना मयुरेश चव्हाण म्हणाला, ट्विटरवर कंगनाला ब्लु टीक आहे. ती टिक त्यालाच असते ज्याला लोक फॉलो करतात. अशावेळी ट्विट करताना तिने जबाबदारीने ट्विट करायला हवं असा सल्ला तिला नेटकऱ्यांनी दिला आहे. यापूर्वीही अशी गल्लत झाली आहे. विकी कौशलचं नाव तिने विकी कौशिक घेतलं होतं. तेव्हा तिला विकी कौशलच म्हणायचं असावं पण अनेकांनी विकी कौशिक कोणी आहे हा हे शोधायला सुरूवात केली होती. एकदा झालेली चूक लक्षात घेऊन कंगनाने ट्विट करताना जरा जपून ट्विट करायला हवं.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like