Monday, March 20, 2023

पाकिस्तानच्या दिशेने तर आपण जात नाही ना?; लष्करप्रमुखाच्या वक्तव्यावर सिताराम येचुरी यांची प्रतिक्रिया

- Advertisement -

नवी दिल्ली : माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणाऱ्या लोकांवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिलेल्या विधानाचा निषेध केला आहे. सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, जनरल बिपिन रावत हे नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचे चुकीचे वर्णन करीत आहेत.

- Advertisement -

लष्करप्रमुखांच्या विधानावरून असे दिसून येते की नरेंद्र मोदी सरकारमध्ये घटनात्मक धोका कसा आहे, तेथे घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आपल्या घटनात्मक भूमिकेच्या बाहेर जात आहे. .आता आपण असा विचार केला पाहिजे की आपण पाकिस्तानच्या मार्गावर जात आहोत, जेथे सैन्याचे राजकारण केले जात आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर लष्करप्रमुख म्हणाले होते की, नेते CAA च्या मुद्यावरून लोकांची दिशाभूल करत आहेत. आम्ही बर्‍याच घटनांचे साक्षीदार आहोत ज्यात विद्यार्थी नेत्यांनी गर्दी चुकीच्या दिशेने नेली, ज्यामुळे जाळपोळ आणि हिंसाचार झाला.