अचलपूरमध्ये विधानसभेसाठी बच्चू कडू विरुद्ध बाकी सगळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी, धामणगाव यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी समर्थक उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला. त्यामुळे एकाच घरात आमदार आणि खासदार असं चित्र अमरावतीत आहे. या दोघांची ताकद येत्या विधानसभा निवडणुकीत कुठले राजकीय समीकरण घडवून आणेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

खासदार नवनीत राणा त्यांचा अधिवेशनात अमरावतीच्या विकासावर आवाज उठवत आहेत. हा आवाज अमरावती जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलवू शकतो का? की अजून काही राजकीय शक्यता निर्माण होतील? या सर्वांचा आगामी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अचलपूर विधानसभा मतदार संघाचा घेतलेला हा आढावा

अचलपूर विधानसभा मतदारसंघ..

आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडूंचा हा मतदारसंघ आहे. आगामी विधानसभा निवडणुकी करीता अचलपूर मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा राजेंद्र गवई याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. भाजप-सेना युतीत अचलपूर शिवसेनेला मिळण्याची आशा आहे. त्यासाठी शिवसेनेकडून नरेंद्र फिस्के , बंडू घोम उमेदवार म्हणून ईच्छुक आहेत.

मतदारसंघात भाजपकडून नेहमीच माळी समाजाला प्राधान्य दिले जाते. या अनुषंगाने दिवंगत माजी राज्यमंत्री विनायकराव कोरडे यांचे चिरंजीव प्रमोद कोरडे, गजानन कोल्हे,प्रवीण तोंडगावकर तर मागील पराभूत उमेदवार अशोक बनसोडे यांचे नावे पुढे येत आहे.

काँग्रेसकडून बबलू देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेखा ठाकरे, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, संगीता ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. तर लोकसभा निवडणुकीत बसपाचे पराभुत झालेले आणि प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा छंद जोपासून असलेले अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखेडेही स्पर्धेत आहेत.

अचलपूर मतदारसंघांमध्ये २०१४ साली परिवर्तनाचे वारे वाहत होते. विद्यमान आमदार बच्चू कडू यांना पराभूत करण्याकरिता राजकीय नेत्यांनी कंबर कसलेली होती. त्यावेळी दमदार उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदारसंघामधे उतरविण्यात आला. त्यावेळी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि प्रहार या तीन पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली आणि बच्चू कडू निवडून आले. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांना होता. मात्र बच्चू कडू यांचे जमिनीवरील राजकारण तसेच गोरगरीब व सामान्य जनतेमध्ये जवळीक, व्यावसायिकांशी हितगूज याचा त्यांना फायदा झाला.

अचलपूर विधानसभा मतदारसंघात मागील तीन निवडणुकांपासून प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ साली त्यांना ५९२३४ मते प्राप्त झाली होती तर भाजपाच्या अशोक बनसोडे यांना ४९०६४ मते प्राप्त झाली होती. काँग्रेसचे ऊमेदवार बबलू देशमूख ३१४७५ मतांसह तिसऱ्या स्थानी होते. विद्यमान आमदार बच्चु कडू हे 2019 ची निवडणूक प्रहारकडून लढणार आहेत. आता इतर राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देतात यावर इथला निकाल अवलंबून आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार बच्चू कडू हे शिवसेनेसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसं न झाल्यास भाजपा, शिवसेना, काॅग्रेस राष्ट्रवादी, रिपाई, बसपासह नवीन चेहरा असलेले युवा स्वाभिमानचे बंटी केजरीवाल, युवा गर्जना लचे अमोल गोहाड यांच्या बरोबर विद्यमान आमदार बच्चू कडूंची जोरदार लढत होणार असल्याचे दीसत आहे.

तालूक्याचा विकास पाहीजे तसा झालेला नसल्याने विद्यमान आमदारांवर टिकेची झोड ऊठली आहे. कार्यकर्त्यांची अरेरावी, शासकीय कर्मचार्‍यांना आणि नोकरदारांना मारहाण यामुळे जनतेमध्ये आमदारांची नकारात्मक प्रतिमा आहे. सद्यस्थितीत मतदार आमदारांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. अचलपूर शहराच्या खूंटलेल्या विकासाला सर्वस्वि आमदार दोषी असल्याचं मानलं जात आहे. या परिस्थितीत अचलपूरची जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इतर आणखी बातम्या –

 

Leave a Comment