अर्थसंकल्प२०१९ |अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात कार्यरत महिला कामगारांना विशेष कर सवलत देण्याची तरतूद केली असल्याचे कळते.शैक्षणिक कर्जात विशेष सवलत, तर कामगार महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी लागणारा खर्च, यातून दिलासा देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच जुलैला सादर होणा-या अर्थसंकल्पात कर प्रणालीमध्ये कामगार महिलांना विशेष सुट देण्यात येणार आहे. देशात विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी सार्वजनिक संगोपन केंद्राच्या शुल्कावर आकारण्यात येणा-या करात विशेष सवलत देण्यात येणार आहे. संगोपन केंद्राच्या शुल्कावर आकारण्यात येणा-या करात 7 हजार 500 रुपयांपर्यंत सुट देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण समाजातील किती घटकांना खुश ठेऊ शकतील ह्या बद्दल शंका आहे कारण सध्या देशासमोरील वृद्धी वाढ रोखलेली असताना आणि बेरोजगारी प्रश्न दिवसेंदिवस वाढत असताना हे आव्हान अर्थमंत्री कसे पार पाडतात ते महत्वाचे.