आरोग्यमंत्रा | थंडीत खाल्लेले अंगाला लागते असे म्हटले जाते तेव्हा तुम्हीही अंगाला लावून घ्या. पण अती ही नको. नाहीतर अशा खाण्याने वजन वाढते. पण थोडी काळजी घेतली तर थंडीचा आनंद लुटताना वजन नियंत्रित ठेवणे सहज शक्य आहे. यासाठी सहज अमलात आणता येण्याजोग्या टिप्स..
इतर महत्वाचे –
आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!
१) हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे रोजच्या आहारात गाजर, काकडी, टोमॅटो, मुळा, बीट या भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांचे सॅलड खाल्ले तरी हरकत नाही. पालक, मेथी, शेपू या पालेभाज्याही खाव्यात. यामुळे वजन वाढणार नाही पण रक्तशुद्धी होईल.
२) ज्या प्रमाणात खाल्ले आहे त्याच प्रमाणात पाणी प्या.
३) थंडीच्या दिवसात लवकर झोपून लवकर उठा.
४) रोज थोडावेळ कोवळी सूर्यकिरणे अंगावर घ्या. यामुळे चयापचय प्रक्रिया सुधारते आणि अन्नाचे पचन लवकर होते. शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.
५) डाळी तसेच भाज्यांचे घरी तयार केलेले सूप दररोज प्रत्येक जेवणाआधी प्या.
६) चहा-कॉफीचे सेवन टाळणे आरोग्यासाठी लाभदायी आहे. पण ते कठीण असल्यास निदान चहा-कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा. झोपण्याआधी चहा-कॉफी पिणे टाळा.
७) थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी खाऊ घालावी. बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, ट्रिप्टोफेन, फायबर, व्हिटॅमिन-बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते