औरंगाबाद । संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र भुमरेंनी अर्ज मागे घेतल्यामुळे बाजी पलटली आणि नितीन पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अर्जुन गाढे यांची निवड झाली. या विजयानंतर शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केला होता.यामध्ये दिनेश परदेशी, आप्पासाहेब पाटील यांनी माघार घेतली तर जगन्नाथ काळे, कृष्णा पाटील डोणगावकर आणि अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदाच्या रिंगणात होते. दुपारी एक वाजेदरम्यान या तिघांमध्ये उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये अर्जुन गाढे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक अधिकाNयांनी दिली. जिल्हा बँकच्या निवडणुकीच्या २० जागांसाठी २१ मार्च रोजी मतदान झाले होते.
या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. यात शेतकरी पॅनलने १४ जागा जिंकल्या. यात ज्येष्ठ संचालक हरिभाऊ बागडे यांचा डपराभव झाला होता.त्यामुळे राजकारण बदलले होते. कृष्णा पाटील डोणगावकर व त्यांच्या पत्नी शिवसेनेत परतल्या, त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ १२ वर पोहोचले म्हणून शिवसेनेचा अध्यक्ष होणार हे सर्वाना कळून चुकले होते.त्यात नितीन पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा केल्याने त्यांना अध्यक्ष होण्याचा बहूमान लाभला आहे. या नाट््यमय घडामोडीनंतर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शिवसेनेचा भगवा जोमाने फडकला आहे.