लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात उठलेलं वादळ अजून शांत व्हायला तयार नाही. या कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना भाजपने या कायद्याच्या समर्थनार्थ सभा, रॅली सुरू केल्या आहेत. लखनऊ येथे CAA च्या समर्थनार्थ बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. त्यांनी म्हंटले की, ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी करावा पण मी तुम्हाला ठासून सांगतो, CAA परत घेतला जाणार नाही. अमित शहा विरोधकांना उद्देशून म्हणाले, तुम्ही नागरिकत्व कायद्याविषयी कितीही गैरसमज पसरवा, कोणत्याही परिस्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी होणारच.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी उत्तर प्रदेशच्या दौर्यावर आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ त्यांनी लखनौमध्ये मोर्चा काढला.सीएएच्या समर्थनार्थ शहा यांची ही सहावी सभा आहे. यापूर्वी त्यांनी अहमदाबाद, जोधपूर, नवी दिल्ली, जबलपूर, वैशाली येथे जाहीर सभा घेतल्या.
शहा यांनी जेएनयूच्या मुद्दय़ावरही भाष्य केले
अमित शाह म्हणाले, ‘नेहरू जी म्हणाले की, शरणार्थ्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय मदत निधीचा वापर केला पाहिजे. त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आवश्यक ते त्यांनी करावे, पण कॉंग्रेसने काहीही केले नाही. ते म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देशद्रोही घोषणाबाजी करण्यात आली. मी जनतेला विचारण्यासाठी आलो आहे की जे भारताचे हजार तुकडे करण्याची चर्चा करतात त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे की नाही. मोदीजींनी त्यांना तुरूंगात टाकले आणि हा राहुल आणि कंपनी सांगत आहे की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-