कोठारे परिवारातील ‘जिजा’ची पहिली दिवाळी

0
78
Mahesh Kothari
Mahesh Kothari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे

मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार महेश कोठारे हे १८ जानेवारीला आजोबा झाले. मुलगा आदिनाथ ने सोशल मीडिया वरुन मुलगी झाल्याची बातमी सर्वांना कळवली होती. दिवाळी सणाच्या निमित्ताने ऊर्मिलाने आपल्या बाळाचा नवा फोटो शेअर केला आहे . जिजाची पहिलीच दिवाळी असल्यामुळे तिच्यासाठी सर्व काही खास असावं, याकडे कोठारी कुटुंबाचा कल आहे.

जिजाचं या दिवाळीला पहिलं अभ्यंगस्नान झाल आणि या क्षणाचा फोटो ऊर्मिलाने “आमच्या जिजाची पहिली दिवाळी, अभ्यंगस्नान” असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. शेअर केलेल्या फोटोत ‘जिजा’ बाबांच्या म्हणजे आदिनाथच्या मांडीवर बसलेली असून तिला उटणे लावले जात आहे. जिजाच्या आगमनामुळे कोठारी कुटुंब आनंदी आहे. त्यामुळे तिच्या ह्या पहिल्या दिवाळी सणाच्या आनंदात कोठारी कुटुंब काहीही कमी पडून देत नाही आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here